नागपूर शहर: मध्यप्रदेशात घरफोडीचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला हैदर गेस्ट हाउस येथून अटक
14 सप्टेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी पोलीस ठाणे तहसील हद्दीतील हैदर गेस्ट हाऊस येथून आरोपी अफरोज सलीम खान व एका विधी संघर्ष ग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. आरोपी मध्यप्रदेश राज्यातील पोलीस ठाणे कान्हीवाडा येथे घरफोडीचा गुन्हा करून येथे लपून बसले होते दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने त्यांना अटक करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले