सातारा: वाढे, आरळे येथील पुलांची दुरावस्था, स्थानिक नागरिकांचा आरोप
Satara, Satara | Sep 17, 2025 सातारा तालुक्यातील वेण्णा नदीवरील वाढे पुल आणि कृष्णा नदीवरील आरळे पुलावर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दोन्ही पुल हे ब्रिटीशकालीन असून या दोन्ही पुलांची पूर्नबांधणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी बुधवारी दुपारी २ वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे.