नागपूर शहर: नागसेन विद्यालयासमोर लालपरी ची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार महिलेचा जागीच मृत्यू, चौकशी अंती बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
सुकेषण माधवन हे त्यांची पत्नी लीना यांच्यासोबत डबल सीट पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतील नागसेन विद्यालयासमोरील सार्वजनिक रोड वरून जात असताना त्यांना एसटी बस चालक संजय रंगारी यांनी मागून धडक दिली . या धडकेत दुचाकी स्वार पती-पत्नी खाली पडून गंभीर जखमी झाले दरम्यान लीना या एसटी बसच्या मागील चाकात आल्याने जागीच मरण पावल्या.