खालापूर: राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, टाटा स्टील फाउंडेशन, कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या सहभागाने खोपोलीच्या महाराजा मंगल कार्यालयाच्या काशी स्पोर्ट मॅटवर राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.