अकोला: बाल हक्क सप्ताह १४ नोव्हेंबरपासून सुरू,गिरीश पुसदकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची प्रतिक्रिया
अकोला, दि. 13 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिनांक १३ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता कार्यालयात प्रतिक्रिया दिली की, बालकांचे हक्क व अधिकार सप्ताह १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सप्ताहात बाल हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन यावर विविध कार्यक्रम, जनजागृती शिबिरे तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहेत. बालकांचे सुरक्षित भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी पालक, शिक्षक व समाजाची सक्रिय भूमिका अपेक्षित आहे.