पालघर: दाभले येथे दुचाकी आणि ट्रकचा अपघात; वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दुचाकी आणि ट्रकची धडक झाल्याने दाबले येथे अपघात घडला आहे. भरधाव वेगातील ट्रक चालकाने दुचाकीला धडक दिली, या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावर पसार झाला. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात आरोपी ट्रक चालक नीरज सिंग यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिते कलम 281 125 (अ)(ब), मोटरवाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.