अहमदपूर: किनगावजवळ सुरू झालेल्या पावसाने अहमदपूर अंबाजोगाई बसमधून प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन केला प्रवास. व्हिडिओ होतंय वायरल
Ahmadpur, Latur | Sep 21, 2025 'प्रशासनाचा बेजबाबदारपणा', अहमदपूर-अंबेजोगाई बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवास दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता अहमदपूरहून अंबेजोगाईकडे जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बेजबाबदार कारभाराचा अनुभव आला. किनगावच्या पुढे सुरू झालेल्या पावसाने बसच्या दुरवस्थेची पोलखोल केली. प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.