गंगापूर: एकनाथनगर भागात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 20 हजारांचा ऐवज केला लंपास
घाणेगाव येथील एकनाथनगर भागात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने, टीव्ही आणि घरगुती साहित्य असा एकूण सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडल्याचे फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादी सुदाम कडुबा जाधव (वय ३१, रा. अंधारी ता. सिल्लोड, ह. एकनाथनगर, घाणेगाव, ता. गंगापूर) हे काही कामास्तव बाहेर गेले होते तेव्हा ही घटना घडली.