पातुर: श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त जिल्ह्यात चार चित्ररथांद्वारे पातुर येथे जनजागृती
Patur, Akola | Dec 3, 2025 हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अकोला जिल्ह्यातून शेकडो भाविक जाणार असून, त्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना आणि सिंधी समाजाची अधिक लोकसंख्या असलेल्या भागांसह जिल्ह्यात चार चित्ररथ फिरत असून साहिबजींच्या जीवनकार्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमाची जनजागृतीही चित्ररथाद्वारे केली जात आहे. अकोल्यासह पातूर, इथे सादर केलं.