नागपूर ग्रामीण: चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया'च्या बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; स्थानिक नागपूर ग्रामीण पोलिसांची कार्यवाही
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी 'चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया' असे छाप असलेल्या बनावट नोटांच्या बंडलांना खऱ्या भारतीय चलनी नोटा असल्याचे भासवून फसवणूक करण्याच्या तयारीत होते.