जालना: जालन्यात गरुडाच्या प्रतिकृतीवर चढून तरुणाचा नाच; व्हिडिओ व्हायरल, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल,
Jalna, Jalna | May 4, 2026 जालना शहरातील मातीबाग तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या गरुड प्रतिमेवर चढून अज्ञात व्यक्तीने नाच केल्याची घटना समोर आली आहे. सोमवार दि. 4 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इसमाने प्रतिमेवर चढून नुकसान करत त्याचा व्हिडिओ तयार करून सामाजिक माध्यमांवर व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत स्वच्छता कर्मचारी आरेफ बेग वहीद बेग रा.हकीम मोहल्ला,जुना जालना यांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.