परळी: संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे यांना दिले उत्तर
Parli, Beed | Nov 7, 2025 मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या अत्यंत गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.कट प्रकरणी बोलणारे, अटक झालेले आणि कबुली देणारे सर्वजण जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत," असा दावा करत मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.