पालघर: आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त केळवे समुद्रकिनारी बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन व सेवा पर्व 2025 अंतर्गत पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व अन्य कचऱ्याचे निर्मूलन करून किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, मु.का.अधिकारी मनोज रानडे, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, एनसीसी एनएसएस स्वयंसेवक, महिला बचत गट, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.