अमरावती: चवरे नगर येथील अवैध मंदिर बांधकाम जमीनदोस्त, मनपाची अतिक्रमण कारवाई
शहरातील अतिक्रमणाविरोधात अमरावती महानगरपालिकेने मोठी कारवाई करत श्रीधर नगर व चवरे नगर परिसरातील रस्त्यावर उभारलेले अवैध मंदिर बांधकाम जमीनदोस्त केले. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानुसार आज ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट व शाखा अभियंता कल्पेश आढाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पडली. मंदिर उभारण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली