कन्नड तालुक्यातील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन आमदार संजना जाधव यांनी आज दि ९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता नागपुर येथे सुरु हिवाळी अधिवेशनात विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. तालुक्यातील विविध जलस्त्रोतांचे खोलीकरण व व्यवस्थापन तातडीने करण्याची मागणी त्यांनी मांडली. नागरिकांना पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.