नागपूर ग्रामीण: केंद्र सरकारच्या नोकरीत देशाची सेवा उत्तम रीतीने करा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित १९ व्या 'रोजगार मेळाव्या'त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात ३०८ नवनियुक्तांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. नागपूरच्या राज नगर येथील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात हा सोहळा पार पडला.