पाथरी येथील केशव बाळबुध्दे यांच्या शेतशिवारात शनिवार दि.6 डिसेंबरला बिबट वाघिणीचा 2महिन्याचा बछडा आढळून आला.पिल्लाला मादी बिबटपर्यंत पोहोचवण्यासाठी भंडारा व साकोली वन विभागातर्फे कारवाई करण्यात आली रविवार दि.7डिसेंबरला पहाटे5 वाजता मादी बिबट्याने पिल्लाला शेतातून भटकलेल्या ठिकाणावरून घेऊन गेल्याने वनविभागाने सुटकेचा निःश्वास घेतला आहे पाथरीतील दहशतीत असणाऱ्या गावकऱ्यांनी देखील पिल्लू आईकडे पोहोचल्याने आनंद व्यक्त केला भंडारा वनविभागाचे उपवनसंरक योगेंद्र सिंह यांनी ही मोहीम फत्ते केली