अकोला: ‘भव्य आरक्षण बचाव मोर्चा’ अशोक वाटिका येथून सुरू झालेला मोर्चा नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला
Akola, Akola | Sep 15, 2025 अकोल्यात ‘भव्य आरक्षण बचाव मोर्चा’ आज काढण्यात आला. अशोक वाटिका येथून सुरू झालेला मोर्चा नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. अनुसूचित जमाती आरक्षणात इतर समाजांचा समावेश, बोगस जात प्रमाणपत्रांचे वाटप, रखडलेली अधिसंख्य पदे तसेच पाळोदी आश्रमशाळेतील शोषण प्रकरणावर कारवाई या मुख्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शेकडो आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामाजिक संघटनांनी संविधानिक हक्कासाठी एकत्र येत आपला निर्धार व्यक्त केला.