पनवेल: कामोठे येथील भाजपा कार्यालयात नव्याने निवड झालेल्या कार्यकारणी सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान
Panvel, Raigad | Nov 8, 2025 पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाच्या वतीने आज शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कामोठे येथील भाजप कार्यालय येथे मंडळातील नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासाठी व समाजकार्यात सक्रिय राहण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी कामोठे मंडळाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाडी व सेलचे अध्यक्ष तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.