सेनगाव: तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे खोळंबलेल्या पेरणीला पुन्हा सुरुवात,शेतकरी रब्बीच्या पेरणी मध्ये मग्न
सेनगांव तालुक्यामध्ये सद्यस्थितीत रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली असून शेतकरी पेरणी मध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. सेनगांव तालुक्यात आजेगांव सह परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने मागील काही दिवसापासून रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र आता ढगाळ वातावरण नाहीसे झाल्याने आजेगांव सह परिसरामध्ये शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने हरभरा व गव्हाची पेरणी करताना दिसून येत आहेत.