जालना: काम न करताच रस्त्याचे बिल उचलल्याचा आरोप; इंदेवाडी-सिरसवाडी रोड प्रकरण पालकमंत्र्यांपर्यंत
Jalna, Jalna | Jun 15, 2026 जालना तालुक्यातील इंदेवाडी ते सिरसवाडी रस्त्याचे काम प्रत्यक्षात न करता संबंधित कंत्राटदाराने परस्पर बिल उचलून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या कथित गैरव्यवहाराची माहिती पालकमंत्री पंकजा मंडे यांच्यापर्यंत पोहोचल्याने आता या प्रकरणात कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. सोमवार दि.15 जून 2026 रोजी दु.4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मनोहर उघडे यांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.