जलजीवन व घरकूल योजनांतील त्रुटी तात्काळ दुरुस्त करा : आमदार खताळ संगमनेर : जलजीवन व घरकूल या दोन्ही योजना थेट सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्याने त्यांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे गरजेचे आहे. कामकाजात जिथे त्रुटी आढळतील, त्या त्वरित दूर करून लाभार्थ्यांना न्याय द्या, असे स्पष्ट निर्देश अमोल खताळ यांनी दिले. रविवारी सकाळी 10 वाजता संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.