भंडारा: 54 वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू; पालांदूर येथील घटना
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे एका ५४ वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृष्णा रामा नंदनवार (वय ५४, रा. पालांदूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १०:३० वा. दरम्यान घडली. कृष्णा नंदनवार हे त्यांच्या घरासमोरील तलावाच्या काठावरून जात असताना अचानक त्यांचा तोल गेला. तोल गेल्याने ते खोल पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडून मरण पावले. या घटनेची माहिती त्यांचा मुलगा शंकर कृष्णा नंदनवार (वय २६) यांनी पोलिसांना दिली.