सातारा: सकल हिंदू समाजाचे सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना निवेदन सातारा शहर पोलीस संशयताच्या पाठीशी असल्याचा आरोप
Satara, Satara | Oct 17, 2025 सातारा शहरात गुरुवार परज, 501 पाटी येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गाईची हत्या केल्याचा प्रकार घडला असून ज्या प्रकरणातील संशयित आरोपींना सातारा शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी पाठीशी घालत आहेत असा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता देण्यात आले.