भारतीय जनता पार्टी रामटेक मंडळाची पदवीधर निवडणूक सदस्य नोंदणी संदर्भात बैठक सोमवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय किराड समाज भवन रामटेक येथे संपन्न झाली. बैठकीत सह नोंदणी प्रमुख सुधीर दिवे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे व माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पदवीधर नोंदणी करता विशेष लक्ष देऊन मार्गदर्शन केले.