राजूरा: राजुरा शहरातील रमाबाई वार्डातील अनेक महिला कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश
घरातील प्रत्येक महिलांना स्वावलंबी, सक्षम आणि सशक्त करणे हेच आमचे प्रमुख ध्येय असून त्यासाठी भाजपाने स्पष्ट कार्ययोजना आखली आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.राजुरा शहरातील रमाबाई वार्डातील येथील अनेक महिला कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दि. ९ नोव्हेंबरला ११ वाजता जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.