अवैध धंदे चालकांकडून शहरात झालेल्या गोळीबाराच्या दोन गंभीर घटनांमुळे जळगाव पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता विशेष ‘ऑपरेशन’ राबवून शांतता भंग करणाऱ्यांसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई केली आहे.