वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्यावर शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Oct 1, 2025 रस्त्याचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराकडून दहा लाखांची खंडणी घेऊन रस्त्याच्या कामातील चार टक्के रक्कम देण्याची मागणी केली, अशी तक्रार संबंधित कंत्राटदाराने वणी पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीवरून मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्याविरुद्ध वणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.