नाशिक: लक्ष लक्ष लखलखत्या दिव्यांनी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी उजळला गोदाकाठ
Nashik, Nashik | Nov 5, 2025 कार्तिकी पौणिमेच्या दिवशी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदाकाठावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष लक्ष दिव्यांनी संपूर्ण गोदाकाठ अक्षरशः उजळून निघाला होता. यावेळी नाशिककर भाविक मोठया संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.