चंद्रपूर: कोरंबी, भुजला आणि बेंबाळ गावपरिसरात वाघाचा धुमाकूळ, वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
चंद्रपुरातील कोरंबी, भुजला, बेंबाळ गावपरिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान शेतकरी शेतात जाताना त्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.