जुनी कामठी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून धारदार गुप्ती जप्त केली आहे. आरोपी ही गुप्ती हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे..