नांदेड: आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ मार्फत परिचयात्मक सराव सत्रास सुरूवात : जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
Nanded, Nanded | Oct 7, 2025 महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात दि ६ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत परिचयात्मक सराव सत्र आयोजित करण्यात आले आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले असून. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे. प्रशिक्षणाचे संचालन NDRF 5 बटालियन पुणे युनिट मार्फत