पारोळा: दिनांक दहा रोजी ब्रम्होत्सावाची महाप्रसादाने सांगता
पारोळ्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आराध्य दैवत भगवान बालाजी यांच्या ब्रम्होत्सावाची सांगता आज शुक्रवार दि १० रोजी महाप्रसादाने केली जाणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या २२ सप्टेंबर पासुन शहरातील प्रती तिरुपती म्हणून ओळख असलेल्या बालाजी महाराजांचा यात्रोत्सव हा ब्रम्होत्साव म्हणून साजरा करण्यात आला यावेळी दररोज वेगवेगळ्या वाहनांचे आयोजन करण्यात आले होते