भंडारा: मंगलमूर्ती सभागृहात भाजपचा 'दिवाळी मिलन' कार्यक्रम उत्साहात; महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री भोयर यांचे मार्गदर्शन
भारतीय जनता पार्टी, भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान 'दिवाळी मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर, आणि विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात तसेच पक्षाच्या संघटनात्मक विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.