नायगाव-खैरगाव: नांदेडजिल्हा महाराष्ट्राबाहेर आहे का? मदतीच्या जी आर मधून नाव वगळल्याने खा.रवींद्र चव्हाण यांची नायगाव येथे सरकारवर टीका
महाराष्ट्र शासनाला नांदेड जिल्हा हा राज्याबाहेर आहे असे वाटते का असा सवाल आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान नायगाव येथे नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केलाय. राज्यात पिकांचे सर्वाधिक 6 लाख 48 हजार हेक्टर नुकसान नांदेड जिल्ह्यात झालेले असताना काल काढण्यात आलेल्या जी आर मधून नांदेड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आले आहे. शासनाने लवकर ही चूक दुरुस्त करून नवीन जी आर काढून त्यात नांदेड जिल्ह्याचे नाव समाविष्ट करावे अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली