भोकरदन: दानापूर येथील जुई धरणातून चोरट्या मार्गाने पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी संबंधित विभागाने केल्या जप्त
आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे असलेल्या जुई धरणातून चोरट्या मार्गाने पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी पाटबंधारे विभाग भोकरदन यांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील काही महिन्यांपासून या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू होता त्यामुळे परिसरात असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्या व या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने जप्तीची कारवाई केली.