धुळे: अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा!
Dhule, Dhule | Jul 6, 2025 धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली आहे. अक्कलपाडा प्रकल्पासह पांझरा, मालनगाव व जामखेडी प्रकल्पातूनही विसर्ग सुरू असून धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे व खबरदारी घ्यावी, असे आवाहन धुळे मध्यम प्रकल्प विभाग आणि अक्कलपाडा उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.