जालना: अभिमन्यू खोतकर यांची माघार; विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण
Jalna, Jalna | Jun 1, 2026 युवा सेना मराठवाडा सचिव अभिमन्यू अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, आज त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण ही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे परभणी-हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अभिमन्यू खोतकर यांनी आपल्या पोस्टमध्ये, "विधानपरिषद निवडणूक लढणार नाही. मा. ना. शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार अर्जुन खोतकर साहेबांचा आदेश अंतिम