गेवराई: धारवंटा येथील शाळेच्या केंद्रप्रमुखाला पाच हजार रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले
Georai, Beed | Sep 20, 2025 तालुक्यातील धारवंटा येथील गोविंद सुखदेव शेळके (वय 56), केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी (दि.20) रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांनी कोळगाव (ता. गेवराई) येथील आर्थिक अनियमिततेसंबंधी चालू खात्याअंतर्गत चौकशी अहवाल व्यवस्थित पाठवून मदत करण्यासाठी शेळके यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.