जळगाव: रामानंद नगर पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकणे जीवावर बेतले; समता नगरातील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव शहरातील समता नगर येथे राहणाऱ्या तरुणाने पत्नी नांदायला येत नाही म्हणून तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला आला होता. दरम्यान त्याच वेळी पत्नीचा फोन आला. फोनवर दोघांचे चांगलेच वाद झाले या वादानंतर पोलीस स्टेशन समोर तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मृत्यू झाला आहे.