अंबरनाथ: बदलापूर अंबरनाथ दरम्यान मालगाडी बंद पडल्यामुळे एक तासापासून वाहतूक ठप्प, रेल्वे प्रवाशांचा ट्रॅकवरून प्रवास
मध्यरात्रीपासून ठाणे, मुंबई,नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. लोकल सेवा पूर्वपदावर येत असतानाच दुपारच्या सुमारास अचानक बदलापूर अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली. तब्बल एक तासापासून अपमार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असल्यामुळे काही प्रवासी रेल्वे ट्रॅक वरून चालताना दिसून आले . दुसरे इंजिन बसवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.