अंबरनाथ: वीस गुन्हे दाखल असलेल्या अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दांपत्याला अंबरनाथ पोलिसांनी मुद्देमाला सह केली अटक
अंबरनाथ परिसरामध्ये गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा कारवाई करून दोन लाख 58 हजार 640 रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ ताब्यात घेतला आणि शरीफ शेख नावाच्या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. शरीफ शेख वर यापूर्वीचे वीस गुन्हे दाखल आहेत तर त्याच्या पत्नीवर यापूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देखील देण्यात आली.