दि.२२ सप्टेंबर ला नांदगाव पोडे) येथील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या आईच्या घरी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या जिवत्या व ८ हजार रुपये रोख असा एकूण २६,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपासदरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने आज दि ५ नोव्हेंबर ला १२ वाजता या चोरीत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे उघड झाले.