जालना: जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; शाळांना तातडीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोरात
Jalna, Jalna | Apr 18, 2026 जालना जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट उसळली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असताना लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शासनाकडून नागरिकांना विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले जात असतानाही शाळा नियमित सुरू असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांना उष्माघात (हीट स्ट्रोक) होण