परभणी: काँग्रेस समविचारी पक्षासोबत निवडणुका लढवणार काँग्रेस भवन येथे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांची माहिती
काँग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता शहरातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष संघटन मजबुतीकरण, शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठविणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची रणनिती बाबत माहिती देताना सांगितले की काँग्रेस समविचारी पक्षासोबत निवडणुका लढवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.