धामणगाव रेल्वे: अरिहंत नगर परसोडी रोड येथे घरात घुसून 50000 रुपये अज्ञात चोरट्याने केले लंपास
अरिहंत नगर परसोडी रोड येथे राहणार भीमराव शंकरराव खरे वय वर्ष 65 आणि दत्तापूर पोलिसात तक्रार दिली आहे. सर्व कुटुंब झोपले असता बाजूच्या रूमला कुलूप लावलेले होते .पहाटे झोपेतून भीमराव उठले असता कुलूप तुटलेले दिसले दोन लोखंडी गोदरेजचे कपाट उघडे दिसले व कपाटातील 50 हजार रुपये नगदी आणि महत्त्वाचे कागदपत्रे कोणीतरी अद्यात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दत्तापूर पोलिसात दिली आहे .तेव्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.