अकोला: शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन — आपत्ती मदत व पिक अनुदान तातडीने देण्याची मागणी
Akola, Akola | Nov 12, 2025 आझाद फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांनी दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपत्ती मदत निधी व पिक अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी केली. खरीप २०२५ मधील आपत्ती मदत, रब्बी तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४–२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांचे अनुदान सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना न मिळाल्याचे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन आझाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोपाल पोहरे यांनी शेतकऱ्यांसह सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.