पुणे शहरातील लोणी काळभोर आणि हडपसर परिसरात जबरदस्तीच्या मार्गांनी दहशत पसरवणाऱ्या एका कुख्यात टोळीप्रमुखाला आणि त्याच्या साथीदाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख लोणी काळभोर येथील कदमवाकवस्तीचा रहिवासी शुभम कैलास कामठे (३०) आणि फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळील रहिवासी शुभम श्रीमंत रसाळ (१९) या दोघांना अटक केली आहे.