सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी, जयेश वसंत जैन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे.