सेनगाव: आजेगाव येथील रवी चौधरी पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल युवा वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी असलेला इयत्ता बारावी वर्गात शिकणारा विद्यार्थी रवी राजू चौधरी याला युवा वृक्षमित्र पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आचार्य बाळकृष्ण यांच्या जन्मोत्सवानिमित्त पतंजली योग समितीच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या बद्दल दिला जाणारा युवा वृक्ष मित्र पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कारासाठी रवी चौधरी याची सुद्धा निवड करण्यात आली होती तर आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हिंगोली येथे प्रदान करण्यात आला.